6 महिन्यात राज्यातील तीन हजार अल्पवयीन मुली बेपत्ता !

6 महिन्यात राज्यातील तीन हजार अल्पवयीन मुली बेपत्ता !

नागपूर :  राज्यातील जवळपास तीन हजार मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या सहा महिन्यात या मुली बेपत्ता झाल्या असून विधानसभेत याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील मुलींच्या तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याबाबतचा एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जानेवारी 2016 ते जून 2016 या काळात  2 हजार 965 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर जानेवारी 2017 ते जून 2017 या वर्षात 2 हजार 881 मुली बेपत्ता झाल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच राज्यात अल्पवयीन आणि हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी 12 पोलीस घटकांमध्ये विशेष अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान 18 वर्षाखालील हरवलेल्या मुला-मुलींच्या तपासासाठी स्वतंत्र पथकाद्वारे शोध मोहीम सुरु केली असून समाजात प्रबोधनात्मक जनजागृती, हरवलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच बेपत्ता बालकांचा शोध घेण्यासाठी जुलै 2015 ते 2017 या कालावधीत ऑपरेशन मुस्कान आणि स्माईल अंतर्गत बेपत्ता अशी नोंद असलेल्या बालकांपैकी 1 हजार 613 बालकांचा शोध घेतला असून यावर्षी 645 बालकांचा शोध लावण्यात संबंधीत पथकाला यश आलं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS