कृपया धावत्या ट्रेनमध्ये अशी स्टंटबाजी करू नका, पहा ह्या तरुणाला किती महागात पडली ही स्टंटबाजी….

कृपया धावत्या ट्रेनमध्ये अशी स्टंटबाजी करू नका, पहा ह्या तरुणाला किती महागात पडली ही स्टंटबाजी….

धावत्या ट्रेनमध्ये दारू पिऊन स्टंटबाजी करणे , हे किती महागात पडू शकत हे या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकतो. अशा स्टंटबाजीत आतापर्यंत कित्येक तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत तर कित्येकांना कायमचं अपंगत्त्व आलं. अशी उदाहरणं डोळ्यासमोर असताना अनेकजण जीवशी खेळ करतात. नांदेड-बंगळुरू एक्स्प्रेसमधला व्हिडिओ समोर आला आहे. हा तरुण मद्यपान करून धावत्या ट्रेनच्या दरवाज्याजवळ लटकत होता. मात्र ही स्टंटबाजी करताना त्याची पकड निसटून तो खाली पडला. काही प्रवाशांनी या स्टंटबाजीचा व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा तरूण २६ वर्षांचा असून तो हिंगोलीचा रहिवाशी असल्याचं समजत आहे. या तरुणाचं नंतर काय झालं हे अद्यापही समजू शकलं नाही. मात्र ट्रेनमधून पडून तो गंभीर जखमी झाल्याचं समजत आहे. म्हणून कृपया करून धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करू नका हे तुमच्या जीवावर बेतू शकत…..

पहा हा व्हिडिओ-

COMMENTS