महाराष्ट्रात चाललंय काय ? शेळी शेतात गेली म्हणून आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण !

महाराष्ट्रात चाललंय काय ? शेळी शेतात गेली म्हणून आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण !

अहमदनगर – एका धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एका हादरुन गेला आहे. श्रीगोंदा तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याची समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. पोलिसांच्या भूमिकेबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

COMMENTS