सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार – काँग्रेस

सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करणार – काँग्रेस

नवी दिल्ली –  आगामी निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा रद्द करणार असल्याची घोषणा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी केली आहे. तिहेरी तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना जेलमध्ये पाठवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही देव यांनी केला आहे. अल्पसंख्याकांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आज राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी बोलत होत्या.

दरम्यान यावेळी राहुल गांधींनी मोदी सरकावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचा चेहरा नीट पाहिला तर तुम्हाला भीती दिसेल, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.  हा देश य एका धर्माचा नाही. हा देश भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. लढाई दोन विचारधारांमधील आहे. अल्पसंख्यांकांनीही या देशासाठी काम केलं असल्याचंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS