तेलंगणात टीआरएसच्या नेत्याची हत्या !

तेलंगणात टीआरएसच्या नेत्याची हत्या !

तेलंगणामध्ये टीआरएसच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. त्यांच्या हत्येची माहिती मिळताच आक्रमक झालेल्या त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोन्ही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विकराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात ही घटना घडली आहे. रविवारी रेड्डी गट आणि त्यांच्या प्रतिस्पर्धकांच्या गटामध्ये वाद झाला होता. त्यानंतर उसळलेल्या संघर्षात  टीआरएसच्या नारायण रेड्डी या नेत्याची हत्या करण्यात आली.  याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे.

COMMENTS