मतदारांना खूश करण्यासाठी ‘या’ नेत्याची भन्नाट ‘आयडिया’,  तुळजापुरातील १५ हजार महिलांना ‘लॉटरी’!

मतदारांना खूश करण्यासाठी ‘या’ नेत्याची भन्नाट ‘आयडिया’, तुळजापुरातील १५ हजार महिलांना ‘लॉटरी’!

तुळजापूर – निवडणूक आली म्हणजे घोषणांचा, आश्वासनांची खैरात होते. त्याशिवाय मतदारांना आपलेस करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जातो. कुठे प्रत्यक्ष तर कुठे अप्रत्यक्षरित्या फायदा करून देण्याचा प्रयत्न केला जातो. कुठे धान्याचे वाटप तर कुठे मोबाईलही वाटप करण्याचे प्रकार होतात. मात्र या सर्वच बाबी पडद्यामागे घडतात. आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. तुळजापूर मतदारंसघातून अशोक जगदाळे रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सर्वच बाजूने चाचपणी सुरू केली आहे.

 अहो… ऐका हो ऐका…. महिला मतदारांसाठी मोफत परळी जोतिर्लिंगाची सफर.. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुष करण्याचा अशोक जगदाळे यांचा प्रयत्न

 

नळदूर्ग पालिका त्यांच्या ताब्यात आहे. आता विधानसभा मतदारसंघात त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या भागातील महिला मतदारांना आपलेस करण्यासाठी श्रावण सोमवारी परळी वैजनाथ येथे सहा ऑगस्टपासून सहलीवर पाठविले जात आहे. राज्यभरातून अनेक महिला भगिनी श्रावणी सोमवारच्या निमित्ताने परळी जोतिर्लिंगाचे दर्शन घेतात. तुळजापूर मतदारसंघातील महिलांना जोतिर्लिंगाला जाण्यासाठी जगदाळे यांच्यामार्फत मोफत बसची सोय केली आहे. शिवाय त्यांच्या जेवणाचाही खर्च केला जात आहे. या मतदारसंघातील प्रत्येक गावातून लकी ड्रॉ पद्धतीने संधी दिली जात आहे. मतदान मिळो अथवा न मिळो पण, तुळजापूर मतदारसंघातील एकूण १५ हजार महिलांना येथील जोतिर्लिंगाचे दर्शन मिळणार आहे. निवडणुकीचे बिगुल अद्याप वाजायचे आहे.
तत्पुर्वीच महिलांना अशी लॉटरी लागल्याने पुढील काळात कशा घडामोडी घडतात. याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS