तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, पण 82 वर्षीय तरुण आमदाराला कोण टक्कर देणार ?

तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, पण 82 वर्षीय तरुण आमदाराला कोण टक्कर देणार ?

तुळजापूर – विधानसभेच्या गेल्या चारनिवडणुकांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अनेक दिग्गजांना धुळ चारलीआहे. विशेष म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये मोदी लाटेतही त्यांनी 35 हजार मतांच्या फरकाने आपला किल्ला शाबूत ठेवला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही काँग्रेसकडून तेच उमेदवार असणार याबाबत शंका नाही. मधुकरराव चव्हाण यांचा आजही गावागावातसंपर्क असून त्यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दररोज सकाळी किमान काही गावात जावून नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचा त्यांचा नित्यक्रम सुरूच आहे. विशेष म्हणजे वयाची 80 पार केली असली तरी त्यांचा उत्साह तरुणाला लाजवेल असाच आहे. येणाऱ्या निवडणुकीत आता त्यांना कोण टक्कर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महेंद्र धुरगुडे –सध्या राष्ट्रवादीत असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र धुरगुडे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तसे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत अशी चर्चा आहे. गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या तीनवेगवेगळ्या गटातून विजय मिळविलेला आहे. तसेच मतदारांसोबत त्यांचा थेट संपर्क ठेवला आहे. जिल्हा परिषदेतील त्यांची कामंकरण्याची चिकाटी, शेतकऱ्यांना अल्पदरात
पानबुडी मोटारी, गरजूंना योग्य ती मदत देऊन त्यांनी मतदारांच्या मनात जागा केली आहे.आता हेच मतदार धुरगुडे यांनी कितपत स्वीकारतील, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत धुरगुडे यांचे फारसे जुळत नाही. पण, त्यांचे पवार परिवारासोबत चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. या संबंधातून धुरगुडेयांनी राष्ट्रवादीचे तिकीट मिळविले  तर आमदार चव्हाण यांच्यासमोर तगडे आवाहन निर्माण करू शकतील. राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाही, तर मात्र धुरगुडे सेनेचा रस्ता धरु शकतात. किंवा अपक्ष म्हणून लढण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे असं बोललं जातंय.

अशोक जगदाळे -राष्ट्रवादीचे दुसरे एक नेते अशोक जगदाळे हेही इच्छुकांमध्ये असणार आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत पक्षाची अब्रू वाचविण्यात मदतकेली आहे. त्यांना ऐनवेळी उमेदवारी डावललीतरी त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचे पुरस्कृत म्हणून लढण्यास तयार झाले. दरम्यान अंतर्गत गटबाजीनेच त्यांच्या वाट्याला पराभव आला. असे असले तरी त्यांनी आगामी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे नळदूर्ग पालिका त्यांच्याच ताब्यात आहे. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असल्याने आमदार चव्हाण यांना तगडी लढत देऊ शकतात.  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते, कार्यकर्ते जगदाळे यांच्यामागे प्रामाणिकपणेराहिले तर मतदारसंघातील समिकरणे बदलू शकतात. त्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार पाटीलयांच्यासोबत जगदाळे जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कैलास पाटील–  शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांचेही नाव शिवसेनेकडून चर्चेत येत आहे.त्यांनी जर या मतदरासंघात तयारी केली तर उस्मानाबाद तालुक्यातील 70 गावातून त्यांना फायदा होऊ शकतो. त्यांचा दैनंदिन संपर्क या गावातअसल्याने सेनेला या भागातून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी चर्चा आहे. दरम्यान उर्वरीत मतदार संघातून शिवसेना म्हणून तसेच स्वतः पाटील यांचा नवीन चेहरा म्हणून मतदार कितपत स्वीकारणार यावरूनच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

देवानंद रोचकरी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघात त्यांचा एक विशिष्ठ वर्ग आहे. यातून त्यांना कोणत्या
पक्षाकडून उमेदवारी मिळणार की पुन्हा एकदा त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागणार, यावरूनच त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज येणार आहे. शिवसेना अथवा भाजपने त्यांना साथ दिली तर त्यांना याचा निश्चित फायदा होईल. दरम्यान भाजपकडून नितिन काळेही इच्छुक असून त्यांनीही मतदारंसघात जोरदार तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली तर याचा फायदा पुन्हा एकदा काँग्रेसला होऊ शकतो. दरम्यान मतविभाजन होत असल्याने आमदार चव्हाण यांचा विजय निश्चित होत असल्याचे गेल्या चार वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे विद्यमान आमदार चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी कोण-कोण मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS