युपीत बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा – अशोक चव्हाण

युपीत बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा – अशोक चव्हाण

नांदेड – महाराष्ट्रातले सरकार बदलले, तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही.”, असे ट्विट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान, त्यांना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? असा सवाल केला आहे.
उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येणार असून यावेळी काही उद्योजक तसंच बॉलिवूड सेलिब्रेटींची भेट घेणार आहेत. यावरुनच आता राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहेत. या पार्श्वभूमी काँग्रेस नेते अशोक चव्हाण विरुध्द भाजपाचे केशव उपाध्ये यांच्यामध्ये ट्विट वाॅर रंगले आहे.
अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भाजपच्या ५ वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले, तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही.” तसेच, “देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये,” असा टोला देखील राज्यातील भाजपा नेत्यांना लगावला होता.
याला प्रतित्तुर देताना केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे की, “आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? महाराष्ट्रात उद्योग येणारच इथे प्रगती होणारच फक्त जरा आदर्श पलीकडे पहा @AshokChavanINC आपल राज्य अजून उत्तम कस होईल याचा विचार करा.” असे म्हटले आहे.

COMMENTS