राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरु, ‘हे’ आमदार करणार प्रवेश ?

राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरु, ‘हे’ आमदार करणार प्रवेश ?

मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. परंतु या निवडणुकीनंतर मात्र चित्र पालटत असल्याचं दिसत आहे. पक्ष सोडून गेलेले काही नेते आता पुन्हा घरवापसी करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन काही दिवसच पार पडले आहेत. त्यामुळे आता सत्तेत आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करण्याचा विचार काही नेते करत असल्याची माहिती आहे. यामध्ये अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. बार्शी येथील अपक्ष आमदार राजेंद्र राऊत तर लोहा- कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत गेलेले बार्शी येथील माजी मंत्री दिलीप सोपल यांचा भाजपाचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी पराभव केला होता. राऊत यांनी निवडणुक निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेऊन त्यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. परंतु आता राज्यात महाविकासआघाडीचं लरकार स्थापन झालं आहे. यानंतर आता राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांना प्रवेश देणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS