पवार साहेबांचे जसे सर्व पक्षात मित्र आहेत तसेच माझेही सर्वपक्षात मित्र आहेत – उदयनराजे भोसले

पवार साहेबांचे जसे सर्व पक्षात मित्र आहेत तसेच माझेही सर्वपक्षात मित्र आहेत – उदयनराजे भोसले

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पक्षाच्या लोकसभा आढावा बैठकीला काहीसे उशिरा पोहोचले. राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात पक्षाची लोकसभा आढावा बैठक सुरू आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वी नवीन जागेत स्थलांतरित झालेल्या पक्षाच्या कार्यालयात उदयनराजे पहिल्यांदाच आले आहेत. उदयनराजेंना हे कार्यालय नेमकं कुठे आहे याची कल्पना नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयात कसं यायचं याची मोबाईलवरून त्यांना माहिती दिल्यानंतर उदयनराजे कार्यालय शोधत काहीसे उशिरा बैठकीला हजर झाले.

दरम्यान साताऱ्यातील काही स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देऊ नये अशी भूमिका घेतली आहे. रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर एका गटानं उदयनराजे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तसेच बैठकीनंतर उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली असून मी फोनवरून माहिती घेतली. मला विरोध झाला तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.  मी साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असून पवार साहेबच याबाबत निर्णय घेतील. तसेच पवार साहेबांचे जसे सर्व पक्षात मित्र आहेत तसेच माझेही सर्वपक्षात मित्र आहेत असं वक्तव्यही यावेळी उदयनराजे यांनी केलं आहे.

COMMENTS