पवारांच्या कॉलर उडवण्यावर काय म्हणाले उदयनराजे ?

पवारांच्या कॉलर उडवण्यावर काय म्हणाले उदयनराजे ?

कराड  क़ॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला होता. याबाबत आता खासदार उदयनराजे भोसले यांनी मौन सोडलं असून शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून त्यांनी माझी कॅालरची केलेली स्टाइल आवडली, याबाबत कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटलं असल्याचं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

दरम्यान यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. अपक्ष उमेदवारीवरुन एका एकाची पुंगी वाजवू शकतो, अशा शब्दात त्यांनी चपराक लगावली आहे. तसेच नेहमीच आपल्या वेगळया स्टाईलसाठी प्रसिध्द असलेले उदयनराजे भोसले यांनी आपली कॅालर उडवत राष्ट्रवादीच्याच सातारा जिल्ह्यातील आमदारांना सज्जड दम भरला आहे. लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे राजेशाही असती तर एका एका आमदाराला दाखवले असते. हिम्मत असेल तर मैदानात या… अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच असा इशारा त्यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिला आहे.

तसेच माझे पोट राजकारणावर चालत नाही,  मुख्यमंत्री यांच्याशी झालेली चर्चा आत्ताच का सांगू ? पण चर्चा झाली एवढे नक्की असल्याचंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उदरयनराजे यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद वाढला असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS