…जेंव्हा खासदार उदयनराजेच महापालिकेचा डंपर चालवतात !

…जेंव्हा खासदार उदयनराजेच महापालिकेचा डंपर चालवतात !

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या विविध स्टाईलमुळे प्रसिध्द आहेत. परंतु आज चक्क उदयनराजे यांनी महापालिकेचा डंपर सातारा शहरात फिरवला आहे. त्यामुळे आज दिवसभर त्यांची चर्चा राज्यभरात सुरु आहे. झालं असं की सातारा नगरपरिषदेने शहरातील विविध कामांसाठी जेसीबी, डंपर आणि ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. त्याचे पूजन खा. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या नवीन डंपरमधून शहरात फेरफटका मारण्याचा मोह उदयनराजेंना आवरला नाही. त्यांनी स्वतः डंपर चालवत शहरात फेरफटका मारला. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली असल्याचं पहावयास मिळालं.

दरम्यान पूर्वीही उदयनराजे हे त्यांच्या विविध बेधडक स्टाईलमुळे चांगलेच परिचीत आहेत. त्यांची शर्टची कॉलर उडवण्याची स्टाईल चांगलीच परिचीत आहे. त्यानंतर आज त्यांनी चक्क डंपर स्वतःच चालवल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

 

COMMENTS