उदयराजेंनी दिलं मिश्किल उत्तर

उदयराजेंनी दिलं मिश्किल उत्तर

सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले नेहमीच कसल्या ना कसल्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी आपल्या पक्षातील नेत्यांना आव्हान देणं असो वा शासनाला इशारा देणं असो त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून ते घेत असतात. आज सातारा शहरातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सर्वांना धक्का दिला. “मी आदत से मजबूर” असून असे धक्के द्यायची मला सवय आहे. कधी कधी हे धक्के मी देतो आणि कधी कधी हे धक्के मलाही बसतात, असं उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये सांगितलं.

सर्वसामांन्यासाठी हा रस्ता कधी सुरु होणार याबाबत बोलताना हिंदी चित्रपटातील ‘अभी के अभी’ हा डायलॉग मारायलादेखील ते विसरले नाहीत. यावेळी उदयनराजे यांनी कॉलर उडवत, जशी इतरांची स्टाईल असते, तशी माझीही स्टाईल आहे. मला कोणी शाबासकी देवो अगर ना देवो ही माझी पद्धत आहे, असे म्हणाले.

दरम्यान, उदयनराजेंनी साताऱ्यातील ग्रेडसेपरेटर उद्घाटनाबाबतची फेसबुक पोस्ट केली आहे. “सातारा शहरवासीयांसाठी स्वप्नवत व महत्वकांक्षी असलेला प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज ग्रेडसेपरेटर चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. सातारा शहराची मोठी वाहतूक कोंडी या भव्य प्रकल्पामुळे सुरळीत होण्यास मदत होणार आहे हा ग्रेडसेपरेटर आजपासून जनतेच्या सेवेत आम्ही मोठ्या आनंदाने सुपूर्त करत आहोत. सातारकर आणि जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत दिलेले प्रेम व आशीर्वाद याची तुलना कोणत्याही गोष्टीशी आम्ही करू शकत नाही हेच प्रेम व आशीर्वाद आम्हास आपली मनोभावे सेवा करण्याची ताकद देते”, असं उदयनराजे म्हणाले.

COMMENTS