… तर भविष्यात “त्या” नक्षलवादाचे नेतृत्व मी करेन – उदयनराजे भोसले

… तर भविष्यात “त्या” नक्षलवादाचे नेतृत्व मी करेन – उदयनराजे भोसले

सातारा – लवकरात लवकर खटाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करा नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच नक्षलवाद उफळत असून भविष्यात या नक्षलवादाचे मी नेतृत्व करेन असंही यावेळी उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. खटाव तालुक्यातील जनतेशी संवाद साधत असताना ते बोलले होते.

दरम्यान खटाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करण्यासाठी याठिकाणच्या शेतक-यांनी वडूज येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला उदयनराजे भोसले यांनी उपस्थित राहुन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच यावेळी बैलगाडीसह वडूज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

COMMENTS