मी राजकारण सोडून तुमच्यासारख्या मित्रांसोबत फिरण्याचा विचार करतोय – उदयनराजे VIDEO

मी राजकारण सोडून तुमच्यासारख्या मित्रांसोबत फिरण्याचा विचार करतोय – उदयनराजे VIDEO

सातारा – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या भिडे गुरुजी यांनी आज साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस याठिकाणी त्यांची भेट झाली. या भेटीबाबत उदयनराजे यांनी ही कौटुंबिक भेट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राजकीय निर्णयाबाबत बैठक होती का? याबाबत विचारले असता त्यांनी मी राजकारण सोडून तुमच्यासारख्या मित्रांसोबत फिरण्याचा विचार करतोय अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. उदयनराजे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भिडे गुरुजी आणि उदयनराजेंची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

COMMENTS