अजित दादांसोबत मतभेद का?, उदयनराजेंची प्रतिक्रिया!

अजित दादांसोबत मतभेद का?, उदयनराजेंची प्रतिक्रिया!

सातारा – साताय्रातील राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात अनेकवेळा मतभेद पहायला मिळाले. परंतु हे मतभेद विसरुन अजित पवार आणि उदयनराजे आज एकत्र आले होते. कारण होतं उदयनराजे यांचा उमेदवारी अर्ज. उदयनराजे भोसले यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. राजवड्यापासून शक्तीप्रदर्शन करुन त्यांनी अर्ज भरला. यावेळी उदयनराजेंसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले उपस्थित होते.

यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी माझ्यावर दहशतीचा बिनबुडाचा आरोप करत असल्याचा आरोप केला. तर विकास ही ऑन गोईंग प्रक्रिया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अजितदादा माझे खास मित्र आहेत, मतभेद तर होणारच. मात्र मतभेदांमुळे प्रेम वाढत असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.

COMMENTS