भाजपमध्ये जाणार का?, उदयनराजे म्हणाले …

भाजपमध्ये जाणार का?, उदयनराजे म्हणाले …

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु याबाबत स्वत: उदयनराजे यांनी खुलासा केला आहे. मी पूर परिस्थितीचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. भाजपमध्ये जाणार असल्याची अपवा असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दादा राजे खर्डेकर यांच्या निधनानंतर आज फलटणमधील आसू या त्यांच्या गावी उदयनराजेंनी त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

आता उदयनराजेंचा भाजप पक्षप्रवेश झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीतच होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच खासदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याची देखील उदयनराजेंची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु उदयनराजेंनी मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS