मुख्यमंत्रिपदाबाबत उदयनराजे भोसले म्हणतात…

मुख्यमंत्रिपदाबाबत उदयनराजे भोसले म्हणतात…

उस्मानाबाद – आगामी काळात तुम्ही मुख्यमंत्री होणार का? याबाबत विचारले असता मुखियमंत्रीपद माझ्यासाठी गौन आहे. मी त्या पदांना किंमत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
उदयनराजे भोसले यांनी आज तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी तुळजाभवानी मातेपुढे साकडं घातलं. आगामी विधानसभा निवडणुकांवेळी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांचं नाव पुढे केलं जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु उदयनराजे यांनी आज या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान राज्यभरात दुष्काळाचं सावट आहे. या दुष्काळ निवारणासाठी उदयनराजे भोसले यांनी आज तुळजाभवानीला साकडं घातलं आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून भरघोष मतांनी निवडून आले. त्यानंतर आज पहिल्यांदच उदयनराजे यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आहे.

COMMENTS