दोन राजेंच्या गळाभेटीने वाद शमला?

दोन राजेंच्या गळाभेटीने वाद शमला?

सातारा – राज्याच्या राजकारण छत्रपती घराण्याचे वंशज भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि फलटण संस्थाचे वंशज आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून विळा भोपळ्याचे वैर होते. लोकसभा निवडणूकीनंतर तर दोघांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर टिका केल्याची घटना घडली होती. दरम्यान, मागील दोन-तीन महिन्यांपासून दोघे वारंवार एकमेकांची भेट घेत आहेत. काल पुण्यात एका लग्न सोहळ्यात एकमेकांना गळाभेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे या दोन्ही राजेंच्यामधील वाद शमला का अशी चर्चा रंगू लागली आहे

राजकारणात एकमेकांचे हाडवैरी कधी मित्र होतील याचा काहीच नेम नाही. म्हणजे राजकारणालाच काही नेम किंवा नियम नाही. राजकारणात कधीच कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो, हे तत्त्व त्रिकालबाधित सत्य असल्याची उदाहरणे वारंवार मिळत राहतात. सातारा जिल्ह्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबतही काही दिवसांपर्यंत असेच होते.

लोकसभा निवडणुकीनंतर निरा-देवधरच्या पाण्यावरून दोघांनी एकमेकांवर टिका करताना पातळी सोडली होती. रामराजेंनी उदयनराजेंना स्वयंघोषीत छत्रपती अशी टीका केली. तसेच चक्रम आहे असेही म्हटले होते. तर उदयनराजे यांनी रामराजेंचा उल्लेख पिसाळलेलं कुत्रं असा करीत, बरं झालं मी बैठकीतून बाहेर पडलो अन्यथा हे कुत्रं मलाही चावलं असतं, अशा खालच्या शब्दांत उदयनराजेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला.रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. त्यामुळे दोघांमधील संबंध प्रचंड ताणले होते.

दरम्यान, आॅक्टोबरमहिन्यात रामराजे सातारा येथील विश्रांतीगृहात बसले असताना उदयनराजेंनी त्या दालनात प्रवेश केला. यावेळी वातावरण तणावाचे निर्माण झाले. पण रामराजेंनी त्यांचे हसत स्वागत केले. त्यांनी दोन राजे एकमेकांशी मनसोक्त गप्ता मारताना, हास्यविनोद करताना दिसले. दोघांच्या या हितगुजामुळे सातारकरांना मात्र प्रचंड आनंद झाला. दरम्यान शनिवारी पुण्यातील लग्न सोहळ्यात गळा भेट घेतल्याने दोघांमध्ये मनोमिलन झाले का अशी चर्चा रंगू लागली आहे.

COMMENTS