उदयनराजे आणि शिवेंद्रराजे चक्क एकत्र!

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे चक्क एकत्र!

सातारा- उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे चक्क एका कार्यक्रमाच्या निम्मिताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. सातारा जिल्ह्यातील बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस वितरण संभारंभाच्या कार्यक्रमात हे दोघे एकत्र आले होते.

मागील काही दिवसांपासून या दोन राजांमध्ये घुसमट सुरू आहे.
नेहमी दोन्ही राजांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेलं अनेक वेळा पाहिलं आहे. त्यासोबतच एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोघे सोडत नाहीत. आणि अचानक या दोघांना एकाच व्यासपीठावर पाहून, उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. शेजारी बसूनसुद्धा दोघ एकमेकांशी बोलले नाही, यावरूनच या दोन राजांमध्ये एकमेकांबद्दल किती द्वेष आहे हे दिसून आलं.

COMMENTS