उदयनराजेंची उमेदवारी पक्की, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजे एकत्र ?

उदयनराजेंची उमेदवारी पक्की, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजे एकत्र ?

मुंबई – सातारा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे देखील होते. या बैठकीत दोन्ही राजेंचं मनोमिलन झालं असून उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान आमच्यामध्ये मतभेद असतील परंतु क्षत्रूत्व नसल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. तसेच एकदिलाने काम करण्यास सर्वांची अनुमती आहे. येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन जायला तयार आहे असंही उदयनराजे यांनी बैठकीनंतर म्हटलं आहे.

तसेच शरद पवार यांच्या पुढे आम्ही कोणीही नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांना समजवावं लागेल. माझ्या निवडणुकीला (विधानसभेला) वेळ आहे. एकत्र काम करायचं असं ठरलेलं असल्याचं  आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर म्हटलं आहे.

COMMENTS