शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर नाराज ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर नाराज ?

मुंबई – बुरखाबंदीची मागणी करणाऱ्या आजच्या ‘सामना’तील अग्रलेखामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. सामना’च्या अग्रलेखातील भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना प्रवक्ते निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान बुरखाबंदी संदर्भात जो निर्णय श्रीलंका सरकारने घेतलाय, भारतातही राष्ट्रीय सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्याची मागणी करणारी भूमिका सामना अग्रलेखातून मांडण्यात आली होती. या भूमिकेनंतर भाजपासह इतर पक्षातील नेत्यांनी असहमती दर्शविली होती. त्यानंतर
सामना अग्रलेखातून मांडण्यात आलेली ही भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना प्रवक्ते निलम गोर्हे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे शिवसेनेवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS