उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची अप्रत्यक्ष पाठराखण!

उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची अप्रत्यक्ष पाठराखण!

मुंबई – मला वाटत नाही ईडीच्या चौकशीतून काही निघेल, दोन दिवस थांबूयात असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अप्ररत्यक्ष ठराखण केली आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच तटकरे व भुजबळ प्रवेशावर प्रश्न विचारला असता उद्धव यांनी बाेलणं टाळलं आहे. चांगले सहकारी शिवसेनेत येत आहेत. तसेच भाजप-शिवसेना एकत्र असून आमचं ठरलं असल्याचंही उद्ठव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. तसेच कोहिनूर प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांचंही ही नाव समोर आलं आहे. त्यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज यांची पाठराखण केली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS