उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास ! VIDEO

उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास ! VIDEO

नाशिक – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यातील विविध विकास कामाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते एकत्रित आले आहेत. या कार्यक्रमासाठी सुभाष भामरे, गिरीश महाजन, दीपक सावंत, दादा भुसे उपस्थित आहेत.यावेळी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांचं एकाच गाडीतून आगमन होताच या दोन्ही नेत्यांचं स्वागत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांनी केलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गेली काही दिवसांपासून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहे. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी एकला चलोची हाक दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा म्हटलं आहे. तसेच राज्यातील आणि देशातील विविध मुद्द्यांवरुन त्यांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली आहे.

अशात आज चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्रित येणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांनी नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली आणि एकत्रित प्रवास करुन काय संकेत द्यायचे आहेत ? असे सवाल आता राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

COMMENTS