उद्धव ठाकरेंच्या ‘या’ विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाजवल्या जोरदार टाळ्या !

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाजवल्या जोरदार टाळ्या !

मुंबई – पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आज मुंबईत करण्यात आले. मेट्रोच्या तीन मार्गिकांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले आदी उपस्थित  होते. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार टाळ्या वाजवल्या असल्याचं पहावयास मिळाले.

दरम्यान यावेळी ठाकरे यांना जे करायचं ते खुलेपणाने, दिलखुलासपणे करायचं आहे. आम्हाला सत्ता हवी आहे, सत्तेची हाव नाही. राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवी आहे. एक चांगलं आणि मजबूत सरकार आणायचं आहे, तसेच आम्ही अनेक चांगल्या गोष्टी करतो आहोत, त्याला मोदींजींची चांगली साथ मिळत असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन सूचक विधान केलं होतं. पुढचं सरकार आपलं असणार असं म्हणत थोडं थांबून पुढचा…आणि पुन्हा थोडं थांबून थेट उपस्थितांनाचा प्रश्न विचारला. पुढचा तुम्हाला काय ते कळलं असेल? असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. भाजपनंतर शिवसेनेनंही मुख्यमंत्री पदावर दावा केला असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली असल्याचं बोललं जात आहे. अशातच आज उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार असं विधान करत शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे.त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS