पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? – उद्धव ठाकरे

पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पगडीवरून राजकारण करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला असून शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पगडी प्रकरणावरून भाष्य केले होते. पुण्यात आलो की पुणेरी पगडी नको फुले पगडी घालून स्वागत करा असे आदेशच त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले होते.त्यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर नाव न घेता निषाणा साधला आहे.

दरम्यान आजच्या घडीला आपण महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्या पगडीचे राजकारण करतो आहोत. मात्र ते करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  आपण टिळक, महात्मा फुले यांचे कार्य विसरतो आहोत आणि त्यांच्या पगडीवरून राजकारण करण्यात धन्यता मानत आहोत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS