मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एकही गाडी नाही, एकूण संपत्ती किती?, वाचा निवडणूक शपथपत्रात दिलेली माहिती !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एकही गाडी नाही, एकूण संपत्ती किती?, वाचा निवडणूक शपथपत्रात दिलेली माहिती !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं शपथपत्र दाखल केलं. निवडणूक शपथपत्रात उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मि ठाकरे यांची एकत्रीत संपती अधिकृत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अंदाजे 125 कोटी आहे. उद्धव ठाकरे यांचे एकूण 3 बंगले आहेत. वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेलं नवं घर तसेच कर्जत येथे फार्म हाऊस आहे.

उत्पन्नाचे स्रोत काय?

विविध कंपन्यांचे भाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड. तसेच स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचं त्यांनी या शपथपत्रात म्हटलं आहे.

एकूण किती गुन्हे आहेत?

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांमध्ये एकूण 23 प्रकरणे आहेत. त्यातील 12 रद्द झाले आहेत तर बाकीची प्रकरणे खाजगी तक्रारी केल्याची आहेत.

आदित्य ठाकरेंची संपत्ती किती? 

दरम्यान उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाकडे आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यांच्या संपत्तीचा आकडा ११ कोटी ३८ लाखांच्याही वर आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखाच्या बॅंक ठेवी, २० लाख ३९ हजारांचे बॉंड शेअर, बीएमडब्ल्यू कार (६ लाख ५०हजार), ६४ लाख ६५ हजाराचे दागिने तसेच १० लाख २२ हजार अशी रक्कम होती. तसेच आदित्य यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ६७ लाख आणि गुंतवणूक ११ कोटी ३८ लाख असून एकूण १६ कोटी ५ लाख ५ हजार २५८ रूपये एवढी त्यांची जाहीर केलेली मालमत्ता आहे.

COMMENTS