उद्धव ठाकरेंनी नाकारली भाजप नेत्याची बैठक !

उद्धव ठाकरेंनी नाकारली भाजप नेत्याची बैठक !

मुंबई  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यासोबत उद्या होणारी बैठक नाकारली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्या भेटण्याची वेळ मागितली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांना भेटण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये धूसफूस सुर आहे. या प्रकल्पाच्या विकास करारावर स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे आता भेट कशाला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान कोकणातील नाणार प्रकल्पाला स्थानिकांसह शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर म्हटलं होतं.परंतु आता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली. दरम्यान हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. परंतु शिवसेनेला अंधारात ठेऊन या प्रकल्पावर स्वाक्ष-या केल्या असल्यामुळे शिवसेनेमध्ये आता नाराजी वाढली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमधील दरी आणखी वाढत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS