ठाकरे सरकारमध्ये घराणेशाही, हे  मंत्री राजकीय कुुुटुंबातील वारस!

ठाकरे सरकारमध्ये घराणेशाही, हे मंत्री राजकीय कुुुटुंबातील वारस!

मुंबई – महाविकास आघाडीच्या सरकारचा अखेर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळात तरूण आमदारांना स्थान देण्यात आलं आहे. यासोबतच मंत्रिमंडळातील काही आमदार हे राजकीय कुटुंबातील वारस आहेत. विधानसभा निवडणुकीत वरळीमधून लढलेले ठाकरे घराण्याचे युवराज आमदार आदित्य ठाकरे यांना कॅबिनेटपद देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंप्रमाणेच अमित देशमुख यांनीही ही ठाकरे सरकारमध्ये  कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसमधील दुसरं नाव म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये घराणेशाही दिसून येत आहे.

ठाकरे सरकारमध्ये घराणेशाही

1) उद्धव ठाकरे – बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव

२) आदित्य ठाकरे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव

३) शंकरराव गडाख – माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव

४) शंभूराज देसाई – दिवंगत माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू

ठाकरे सरकारमधील घराणेशाही – राष्ट्रवादी काँग्रेस

1) जयंत पाटील – दिवंगत माजी मंत्री राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव

२) अजित पवार – शरद पवारांचे पुतणे

4) दिलीप वळसे पाटील – माजी आमदार दत्तात्र्य वळसे पाटील यांचे चिरंजीव

५) बाळासाहेब पाटील – काँग्रेसचे दिवंगत नेते पी. डी. पाटील यांचे चिरंजीव

६) धनंजय मुंडे – माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे

७) राजेंद्र शिंगणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत भास्करराव शिंगणे यांचे चिरंजीव

८) राजेश टोपे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अंकुशराव टोपे यांचे चिरंजीव

राज्यमंत्री

९) प्राजक्त तनपुरे – माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव आणि जयंत पाटील यांचे भाचे

१०) आदिती तटकरे – विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या

काँग्रेसचे मंत्री
कॅबिनेटमंत्री

1) बाळासाहेब थोरात – ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचे चिरंजीव

२) अशोक चव्हाण – माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव

३) अमित देशमुख – माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव

४) सुनिल केदार – ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत बाबासाहेब केदार यांचे चिरंजीव

५) यशोमती ठाकूर – काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत भय्यासाहेब ठाकूर यांच्या कन्या

६) वर्षा गायकवाड – माजी खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकडवाड यांच्या कन्या

७) सतेज पाटील – माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे चिरंजीव

८) विश्वजित कदम – माजी मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव

COMMENTS