मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर या दोन नेत्यांमधील वाद मिटला!

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर या दोन नेत्यांमधील वाद मिटला!

मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद मिटला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अखेर मनोमिलन झालं असून मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांनी अखेर हातात हात घेतला आहे. या बैठकीस चंद्रकांत खैरे व अब्दुल सत्तार यांच्याशिवाय शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे हे उपस्थित होते.

दरम्यान कालपर्यंत झालेला विषय संपलेला आहे. इथुन पुढे पक्ष शिस्त व पक्षाचा आदेश मानून पक्षाने जी चौकट आखून दिली आहे, त्यामध्ये काम करा. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मान्य केला आहे व मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील पक्षप्रमुखांना शब्द दिला असल्याची माहिती आहे. आमच्याकडून तुम्हाला त्रास होईल, असं काम कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. दोघांमधील सर्व गैरसमज दूर झाले आहेत. असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद मिटला आहे.

COMMENTS