…तर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ -उद्धव ठाकरे

…तर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ -उद्धव ठाकरे

मुंबई – जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्याची घोषणा करणार असतील तर आम्ही पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी पुढाकार घेऊ असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच आशीष देशमुख यांनी चांगला अभ्यासपूर्ण प्रस्ताव दिला असून मला त्यांचं कौतुक वाटतं असंही ते म्हणाले आहेत. तसेच  नाणार राहणार नाही जाणार हे आता नक्की झालं असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान प्रकल्प गुजरातला जाण्याची भीती दाखवली जात होती. कोकण नाही तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प जावा परंतु  एकसारखी गुजरातची भीती दाखवू नये असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. यापूर्वी विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न केला नाही, या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळे विदर्भाला त्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रकल्पापेक्षा काही केंद्र विदर्भात नेली जातात. तसेच मुख़्यमंत्री म्हणाले की भावनांचा अनादर करुन प्रकल्प लादणार नाही. देसाईंनी जो निर्णय घेतला तो अभ्यासपूर्ण होता.

कायदे हे जनतेसाठी आहेत जनता कायद्यासाठी नाही आणि आम्ही जनतेसोबत आहोत. नुसतं विदर्भात पोकळ अधिवेशन घेण्यात काही होणार नाही. त्यामुळे काही चांगले निर्णय मुंबईत बसूनही घेतले जाऊ शकतात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS