आरे कारशेडबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

आरे कारशेडबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई – आरे कारशेडबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली असून यपुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी काहीही केलं नाही हे सगळ्या पत्रकारांना माहित आहे. मी काहीही न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. महागाई, भ्रष्टाचार, टंचाई या सगळ्याचा सामना आम्हाला करायचा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळ पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यांचा सामना महाविकास आघाडीला करायचा आहे. मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत तरीही हे शिवधनुष्य उचललं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो? याचं उत्तर जनतेला द्यायचं आहे असंही प्रतिपादन त्यांनी केलं आहे. मोठी आव्हानं पाहून मी पळून गेलेलो नाही. हे आव्हान स्वीकारलं आहे.मी न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं काही सांगितलं नव्हतं असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

COMMENTS