जेव्हा मी शिवसैनिकांच्या मनातून उतरेन तेव्हा पदावरून दूर होईन – उद्धव ठाकरे

जेव्हा मी शिवसैनिकांच्या मनातून उतरेन तेव्हा पदावरून दूर होईन – उद्धव ठाकरे

रायगड – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याच्या दुस-या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आज महाड येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. आमचं काम चार भिंतीच्या आड नाही. मेट्रोसाठी झाड कापली जाताहेत. देशाचं, राजकारणाचं वातावरण बिघडत आहे.  शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचंय

मला कुठल्या पक्षाची चिंता नाही, देशाची जनतेची आहे. वर्षात काय केलंत ते लोकांसमोर मांडा, कालपरवा दुष्काळ जाहीर केला. थंडी पडायच्या आधी दुष्काळ आला विदर्भ, मराठवाड्यात भीषण स्थिती असून मूलभूत प्रश्नांकडे बघा, वरवरचं करू नका.दुष्काळी काम कधी सुरू करणार, चारा पाणी कुठून आणणार, नियोजन काय आहे असे सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. तसेच जेव्हा मी शिवसैनकांच्या मनातून उत्तरेन तेव्हा पदावरून दूर होईन असंही यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असून ते होत नाही तोपर्यंत मदानध हत्तीवर आमचा अंकुश असणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. युतीसाठी माझ्याकडून काहीच चर्चा नाही. पाण्याचा दुष्काळ, पण थापांचा सुकाळ झाला आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी जगण्याची शिकवण दिली. आजही तेच काम कुटुंब करतंय. पदाधिका-यांनी मार्गदर्शन करावं, अनेक प्रलोभन येतील, गाफील राहू नका, लोकांना राफेल काय आहे ते सांगा, त्यांच्या पापात आपण सहभागी होऊ नका, मोदी देशांतर करत असल्याचा आरोपही यावेळी ठाकरे यांनी केला आहे.

मला खोटं बोलून मतं नको आहेत, अशी सत्ता नकोय. मत दिल्यावर लोकांनी मला बोलता कामा नये. कर्जमुक्ती झाली कुणाची, उज्वला योजनेत खोटं पसरवलं जात आहे. हे सरकार महागाई कमी करू शकले नाही. तसेच राममंदिर ही केस 3 मिनिटात उडवली असून मी अयोध्येला जाऊन मोदींना प्रश्न विचारणार आहे. नितीन गडकरी – चुनावी जुमला असून हा निर्लज्जपणा आहे. आम्हाला आशा थापाड्यांची गरज नसून अच्छे दिन, घर दे , नोकऱ्या देऊ हे चुनावी जुमले आहेत, आता राम मंदिर हा जुमला होता सांगून टाका, 280 वरून 2 वर याल असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.विटा जमावल्या त्या सिंहासनावर चढून जाण्यासाठी जमवल्या आहेत.

तसेच जिल्ह्यातील मतदार नोंदणीकडे लक्ष देण्याचा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे. तुम्ही रायगडचे शिवसैनिक आहात युती होणार की नाही याची चिंता करू नका, ते मी बघीन, मला माझा भगवा हवाय, बाकीच्या फडक्यांची मला गरज नाही असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS