भगवदगीता वाटण्यापेक्षा आधूनिक शिक्षण द्या – उद्धव ठाकरे

भगवदगीता वाटण्यापेक्षा आधूनिक शिक्षण द्या – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा एकदा टोला लगावला आहे. मुंबईतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना भगवदगीता देण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. याच निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला असून विद्यार्थ्यांना भगवदगीता वाटण्यापेक्षा त्यांना आधूनिक शिक्षण द्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच  जे वाटप करतायत ती भगवदगीता संस्कृतमध्ये आहे का गुजरातीमध्ये ? असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच यापेक्षा विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण द्या. वेळेवर परीक्षा घ्या, निकाल लावा, पेपर फुटी नको असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंबईत खड्डे पडतायत पण जबाबदारी फक्त पालिकेची नाही सर्वांची आहे. सरकारचीपण आहे. समृद्धीमार्ग आणि नाणार प्रकल्प हे वेगळे असून समृद्धीमध्ये शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा मुद्दा होता. नाणारमुळे फळबागा उध्वस्त होणार असून पर्यावरणाचा नाश होणार असल्यामुळे विरोध केला जात असल्याचं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तसेच नाणार प्रकल्प हा विषय संपलाय तरी मुख्यमंत्री जिवंत का करत आहेत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

COMMENTS