सांगली, जळगाव ही 2019च्या विजयाची नांदी असेल तर मग भंडारा-गोंदियाचे काय आहे ? – उद्धव ठाकरे

सांगली, जळगाव ही 2019च्या विजयाची नांदी असेल तर मग भंडारा-गोंदियाचे काय आहे ? – उद्धव ठाकरे

मुंबई – सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही 2019 च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान सांगलीत काय किंवा जळगावात काय, निवडणुकीपूर्वी घाऊक पक्षांतरे भाजपने करून घेतली. जे विजयी झाले ते भाजपचे पूर्वाश्रमीचे विरोधकच आहेत व याच मंडळींनी सांगली किंवा जळगावसारख्या शहरांची वाट लावली अशी बोंब पूर्वी भाजप मारत होता. मात्र आता हेच ‘वाटमारे’ भाजपचे बहुसंख्य उमेदवार बनले व विजयी झाले असल्याचंही  उद्धव ठाकरे यांनी सामनामधून म्हटलं आहे. जळगाव-सांगलीमध्ये आज जे भाजपबरोबर गेले आहेत ती सत्तेबरोबर आलेली सूज आहे. सत्ता आली की, अशी ‘सूज’ येतच असते. त्यामुळे हे काही चांगल्या राजकीय आरोग्याचं लक्षण नाही. आज सत्तेमुळे भाजपात आलेली मंडळी उद्या सत्ता नसताना दुसरीकडे गेलेली असतील आणि पक्षाला आज जी सूज आलेली दिसत आहे ती उतरलेली असेल. त्या पक्षाच्या दादा-भाऊ यांनी हे लक्षात घेतलेले बरे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS