बीकेसी संकुलातील विमा कंपन्यांवर शिवसेना मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व!

बीकेसी संकुलातील विमा कंपन्यांवर शिवसेना मोर्चा काढणार, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व!

मुंबई – शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परीषद घेतली. यावेळी त्यांनी येत्या बुधवारी बीकेसी संकुलातील विमा कंपन्यांवर मोर्चा काढला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बुधवारी ११ वाजता एशियन हार्ट इन्स्टिट्यूटपासून हा मोर्चा सुरू होवून भारती एक्सा जनरल इन्शूरन्स कंपनीवर मोर्चा जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.हा मोर्चा केवळ एका कंपनीवर प्रतिकात्मक म्हणून जाणार आहे, ज्यामुळं इतर कंपन्यांना इशारा मिळेल. तसेच या मोर्चाचे नेतृत्व स्वत:
उद्धव ठाकरे करणार आहेत. तसेच पंढरपूरला मी जाणार नाही, कोण बोलले तुम्हाला असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेना आपल्या भाषेत विमा कंपन्यांना समजावून सांगेल. हा शेतक-यांसाठी मोर्चा असेल, बुधवारचा इशारा मोर्चा असेल, त्यानंतरही प्रकरणं निकालात नाही निघाली तर सेना आपल्या भाषेत समजावून सांगणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेनं पिकविमा योजनेचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून उचलला आहे. कर्जमाफी व पिकविमा योजना चांगल्या पण यंत्रणा व्यवस्थित नसल्यानं या योजना शेतक-यापर्यंत पोहचत नाहीत. पिकविमा कंपन्यांना इशारा दिल्यानंतर फरक पडला आहे. पिकविम्याचे पैसे मिळू लागले आहेत. कर्जमाफी झालेल़्या शेतक-यांची नावे बँकेच्या दारात लावावीत. सरकारी प्रयत्न सुरू आहेत, जिथं अडथळे येतायत ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कृषी आयोग हा स्वतंत्र असावा. त्याला अधिक अधिकार असावेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यंत्रणा काम करत नसेल तर यंत्रणा बदलण्याचा विचार करावा लागेल. पण सध्या यंत्रणेत सुधारणा करावी लागेल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS