ट्रम्पसोबत फोटो काढता तसं शेतकऱ्यांसोबतही फोटो काढा, उद्धव ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका !

ट्रम्पसोबत फोटो काढता तसं शेतकऱ्यांसोबतही फोटो काढा, उद्धव ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका !

बीड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. सरकारने तळं दिलं पण पाणी कोण देणार असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ‘नरेंद्र मोदी सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. सरकारची ताकद मोठी आहे. त्यांचा नेहमी परदेश दौरा असतो. ट्रम्पसोबत फोटो काढता तसं माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबतही फोटो काढा’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे. ते आजपासून मराठवाडा दौऱ्यावर असून बीडमधील सभेदरम्यान ते बोलत होते.

दरम्यान  मी इथं राजकारण करायला आलेलो नाही. कोरड्या भाषणांनी काही होणार नाही. त्यासाठी आता सरकारला जाब विचारावा लागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच इथून पुढे काहीही झालं तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही. त्यांच्यासाठी शिवसेना कायम सज्ज असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS