माझी स्वयंपाकही करायची तयारी, पण स्वयंपाकासाठी तुमच्या धरणातले पाणी नको – उद्धव ठाकरे

माझी स्वयंपाकही करायची तयारी, पण स्वयंपाकासाठी तुमच्या धरणातले पाणी नको – उद्धव ठाकरे

बार्शी – जनतेसाठी माझी स्वयंपाकही करायची तयारी आहे. पण स्वयंपाकासाठी तुमच्या धरणातले पाणी नको. अशा औलादी समाजात नसलेल्या बऱ्या,’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. तसेच यशासाठी मी स्वतःच्याच सरकारच्या पाठीत, वसंतदादांच्या पाठीत वार केल्याप्रमाणे करणार नाही,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टी केली आहे.सोलापूरमधील बार्शी येथील सभेत ते बोलत होते.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची खिल्ली उडवली होती. ‘शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही,’ असा सणसणीत टोला पवार यांनी लगावला होता. त्यावर जनतेसाठी माझी स्वयंपाकही करायची तयारी आहे. पण स्वयंपाकासाठी तुमच्या धरणातले पाणी नको. अशा औलादी समाजात नसलेल्या बऱ्या,’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.

COMMENTS