बारा महिने तप केलं अन गाढवासंगं पाप केलं, शिवसेनेची राष्ट्रवादीवर टीका!

बारा महिने तप केलं अन गाढवासंगं पाप केलं, शिवसेनेची राष्ट्रवादीवर टीका!

मुंबई – अहमदनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाडपला पाठिंबा दिला. यावरुन मुखपत्र ‘सामना’ संपादकीयतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे.2014 साली याच राष्ट्रवादीने भाजप सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाचच सांगत असतात. यानिमित्ताने दोघेही नागडे झाले आहेत व महाराष्ट्र त्यांच्यावर हसत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठींबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्याना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठींबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले. ही एका प्रकारे सौदेेबाजीच म्हणावी लागेल. नगरमध्ये राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर बसवला यासाठी भाजपचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेऊन भाजपने सिद्ध केले आहे.
धुळे महापालिकेत भाजप कधीही पाच-सात जागांच्या वर गेली नव्हती. तेथे एकदम पन्नासचा आकडा गाठून सत्ता काबीज केली जाते. जळगावतही तेच. हा खेळ पैशांचा, सत्तेच्या माध्यमातून दाबदबावचा आणि तांत्रिक घोटाळ्याचा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणां’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते.
सत्य हेच आहे. ते नगरच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर आले.यावरुन बारा महिने तप केलं अन गाढवासंगं पाप केलं अशीच अवस्था राष्ट्रवादीची झाली असुन भाजप-काँग्रेस- राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS