पालघरमधून शिवसेनेचा उमेदवार ठरला, उद्धव ठाकरेंनी केलं जाहीर!

पालघरमधून शिवसेनेचा उमेदवार ठरला, उद्धव ठाकरेंनी केलं जाहीर!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार ठरला आहे. भाजपपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी देण्यात आली असल्याच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठीकरे यांनी म्हटलं आहे. राजेंद्र गावित यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान श्रीनिवास वनगा यांना पालघरमधून शिवसेना लोकसभेचं तिकिट देण्यात येणार होतं. मात्र श्रीनिवास वनगा यांनी विधानसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्यामुळे  तूर्तास त्यांना विधानसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली. त्यानंतर मी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र असं असलं तरीही माझ्यासाठी भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समान आहेत. पालघरमध्ये चांगलं काम करणार असल्याचं राजेंद्र गावित यांनी म्हटलं आहे.

COMMENTS