संघाला वाटत असेल की हे सरकार मंदिर बांधू शकत नाही तर संघ हे सरकार खाली का खेचत नाही ? – उद्धव ठाकरे

संघाला वाटत असेल की हे सरकार मंदिर बांधू शकत नाही तर संघ हे सरकार खाली का खेचत नाही ? – उद्धव ठाकरे

मुंबई – संघाला वाटत असेल की हे सरकार राममंदिर बांधू शकत नाही तर संघ हे सरकार खाली का खेचत नाही असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आज शिवसेना भवनमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते बोलत होते. भाषणात गुंडाळला गेलेला अयोध्येचा मुद्दा शिवसेने मुळे ऐरणीवर आला असून 25 तारखेला अयोध्येला जाणार असल्याचं पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या बैठकीत महाराष्ट्रातल्या दुष्काळाबद्दल आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असून जी काही मदत करता येईल ती करा अस पदाधिकाऱ्यांना सांगितल असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच सरकार दुष्काळाबद्दल शब्दांचा खेळ करत असल्याचा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

COMMENTS