शरद पवारांच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

शरद पवारांच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला तिस-या आघाडीत येण्याचं अप्रत्यक्षरित्या निमंत्रण दिलं होतं. शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आज शरद पवारांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्वांच्या ऑफर आल्यावर बघू असं त्यांनी म्हटलं आहे. रंगशारदा येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान आज झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी उद्धव यांच्या आधी भाषण केलं आहे. यावेळी 2019 साठी त्यांनी पुन्हा स्वबळाची भूमिका मांडली आहे. तोच मुद्दा उद्धव यांनीही त्यांच्या भाषणात मांडला. यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. कुठल्याही परीस्थित विजय हेच आपलं पुढचं ध्येय असून नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे आणि विप्लव बजोरीया हे आपले उमेदवार जिंकले. दराडे यांच्याकडे 250 मते होती तर विप्लव बाजोरीया यांच्याकडे 97 मते होती. तरीही आपण त्या परिस्थितीत विजय खेचुन आणला. अशी कुटुंबं मला शिवसेनेत चालणार आहेत. असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच ही विधान परिषद निवडणूकही आपण जिंकणार आहोत असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

 

COMMENTS