‘हे’ मी स्वीकारलेले नाही, मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी काढली समजूत !

‘हे’ मी स्वीकारलेले नाही, मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी काढली समजूत !

मुंबई – आगामी लोकॊभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाडपमध्ये युती झाली आहे. युतीच्या घोषणेनंतर आज काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उद्ध ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी काही शिवसैनिकांना नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली आहे.
ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे मी स्वीकारलेले नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच मागील 25 वर्ष आपण जे करत होतो, ते यावेळी मी स्वीकारलेले नाही. आपण तहात जिंकलो आहे आता युद्धातही जिंकायचे आहे. मी जे करेन ते शिवसैनिकांच्या हिताचेच असून जबाबदारीचे समसमान वाटप मी मान्य केलं आहे. आपलं स्वप्न आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हणत ठाकरे यांनी मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांची समजूत काढली आहे.

COMMENTS