“…तर वर्षावर ठिय्या आंदोलन करा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश !”

“…तर वर्षावर ठिय्या आंदोलन करा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश !”

मुंबई – अहमदनगर दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. हत्या झालेल्या शिवसैनिकांचं दहावं झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे एसपींना आदेश दिले असल्याचे शिवसैनिकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. त्यामुळे शिवसैनिकांना अटक झाल्यास वर्षावर जाऊन ठिय्या आंदोलन करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले असल्याची माहिती शिवसेना नेते आणि माजी आमदार अनिल राठोड यांनी दिली आहे. तसेच यावेळी शिवसेना नेते, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह लोखंडे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.

दरम्यान याबाबत उद्या रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर हे नगरमधील केडगावला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच शिवसैनिकांचं अटकसत्र सुरू झाल्यास मंगळवारी हजारो शिवसैनिक नगरहून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल होणार आहेत. तसेच 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे हे अहमदनगरमधील घटनास्थळाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचंही राठोड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS