शिवसेनेतील नाराज आमदारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पुनर्वसन !

शिवसेनेतील नाराज आमदारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पुनर्वसन !

मुंबई – शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. परंतु मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेतील अनेक आमदार नाराज झाले होते. त्यामुळे या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.जोगेश्वरीचे शिवसेनेचे नाराज आमदार रवींद्र वायकर यांना मुख्यमंत्री समन्वयक म्हणून निवडत कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अर्जुन खोतकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनीही मंत्रिपद न मिळाल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे तानाजी सावंत यांच्यावर नाराज असून पक्षातील इतर नेतेही त्यांच्यावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांनी पक्षाचं योग्यप्रकारे काम केलं नाही, असा ठपका त्यांच्यावर आहे. उद्धव ठाकरे पक्षातील नाराजांसाठी अनेक बदल करतील, असंही शिवसेनेचे नेते सांगत आहेत. त्यामुळे या बदलांनंतर उद्धव ठाकरे तानाजी सावंत यांच्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS