विधान परिषद निकालावर उद्धव ठाकरे यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

विधान परिषद निकालावर उद्धव ठाकरे यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

मुंबई –  विधान परिषद निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. नक्कीच आनंद आहे. शिवसेनेनं 6 पैकी 3 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 2 जागा आम्ही नव्यानं जिंकलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये भर पडली आहे. ज्यांनी ज्यांनी या विजयात हातभार लावला त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. विधान परिषद निवडणुकीत इतरत्रही कुणी जिंकलं असेल त्या सर्वांचं अभिनंदन करतो असंही उद्धव ठारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड या जागेवर शिवसेनेविरुद्ध सर्व एकवटले. तिथं त्या सर्वांनी मिळून शिवसेनचा पराभव केला. परंतु भाजपनं जाहीर केलं पाहिजे की त्यांनी शिवसेनेला मतदान करण्याचा निर्णय घेतला होता की त्यांची सर्वच्या सर्व मतं फुटली ? त्यांचं त्यांनी शोध – चिंतन केलं पाहिजे. असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच तटकरे यांच्यावर जे घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांना मतदान करण्यासाठी जी मते एकवटली ती त्यांच्यावरील आरोपांची एकवटून चौकशी करतील. भाजपची मतं फुटलीत का याचा तपास मुख्यमंत्री करतील. त्याचा अभ्यास करून त्याबाबत ते खुलासा करतील. असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS