सेना-भाजप युतीला तुर्तास तरी ब्रेक !

सेना-भाजप युतीला तुर्तास तरी ब्रेक !

मुंबई – शिवसेना भाजपमधील युतीला तुर्तास तरी ब्रेक लागला असल्याचं  दिसतं आहे. कारण भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याची वेळ मागितली होती परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तूर्तास तरी भेटण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भाजपवर नाराजी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. या भेटीत आगामी काळातील निवडणुकीमध्ये युतीबाबत चर्चा करण्यात येणार होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या नकारामुळे सध्या तरी ही चर्चा होणार नसल्याचं दिसत आहे. तसेच अहमदनगरमध्ये शिवसैनिकांचं झालेलं दुहेरी हत्यांकाड, नाणार प्रकल्पाला वाढत्या विरोधामुळे युतीच्या चर्चेला सध्या तरी खीळ बसली असल्याची दिसत आहे.

 

 

COMMENTS