फडणवीस सरकारनं सुरु केलेली ‘ही’ योजना,  ठाकरे सरकारनं केली बंद !

फडणवीस सरकारनं सुरु केलेली ‘ही’ योजना, ठाकरे सरकारनं केली बंद !

मुंबई – फडणवीस सरकारनं सुरु केलेली ‘बळीराजा चेतना योजना’ बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयश आले आहे. त्यामुळे 24 जुलै 2015 रोजी जाहीर करण्यात आलेली ही योजना तातडीने बंद करण्याचा आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने जारी केला आहे. या योजनेत व्यथित शेतकर्‍यांना शोधणे, शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणे, त्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवणे आणि कर्जाचे पुनर्गठन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. परंतु तरीही शेतकरी आत्महत्येचं प्रमाण सुरु असल्यामुळे ही योजना बंद करण्यात आली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजप महायुती सरकारचे नेतृत्व केले त्या काळात, म्हणजे 2015 ते 2018 दरम्यान यापैकी 46% किंवा 14 हजार 989 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.
राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2001 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्रात 32 हजार 605 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तसेच उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात कोणतीही घट झाली नसल्याची माहिती सरकारला एका अहवालातून मिळाली. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.

COMMENTS