शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध, यातलं एकही वचन खोटं ठरणारं नाही – उद्धव ठाकरे

शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध, यातलं एकही वचन खोटं ठरणारं नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज (शनिवारी) हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे.

१० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणार नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, त्यांची आरोग्य चाचणी एका रुपयांत आम्ही करतो,सर्वांच्या मागण्यांचा आणि सर्व बाबींचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आला आहे. हा वचननामा तयार करताना महिला वर्गांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बारकोडही देण्यात आला आहे.

शिवसेना वचननामा ठळक मुद्दे

स्थानिकांना ८० टक्के नाेकरीतील आरक्षण सक्तीचे करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करून त्यात कंत्राटी व असंघटीत कामगारांचा समावेश करणार

एसआरए याेजना असफल झालेल्या ठिकाणी मुंबई अभय याेजना राबवणार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार. तसंच जागतिक मराठी विद्यापीठ स्थापन करणार

मुंबईतील रेसकाेर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क विकसित करणार

राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्र स्थापन करून १० रूपयांत जेवणाची थाळी देणार

कर्जबाजारी शेतक-यांचा ७/१२ काेरा करणार

अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतक-यांच्या खात्यात थेट १० हजार रूपये प्रतिवर्षी जमा करणार

३०० युनिटपर्यंत वीजवापर करणा-या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण माेफत करणार

गाव ते इतर ठिकाणच्या शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी २५०० विशेष बसची सेवा सुरू करणार

राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार

सर्व जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेजसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

१ रूपयांत आराेग्य चाचणी केली जाईल, ज्यामध्ये २०० वर चाचण्या उपलब्ध असतील

सर्व खेड्यातील रस्ते बारमाही टीकाऊ करणार

निराधार पेन्शन याेजनेअंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार

सर्व गावांतील धार्मिक स्थळांचे सामाजिक महत्व लक्षात घेवून अनुदान देणार

प्रत्येक जिल्ह्यात एक महिला बचत गट भवन उभारून तिथं बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीकरता जागा देणार

विद्यार्थीनींना माेफत सँनिटरी नँपकीन देणार

शहरांमध्ये वर्किंग वूमन हॉस्टेल सुविधा देणार

शेत तिथं ठिबक सिंचन अंतर्गत ३ वर्षाकरता ९५ टक्के अनुदान देणार

COMMENTS