संजय राऊतांचा उध्दव ठाकरेंना कानमंत्र

संजय राऊतांचा उध्दव ठाकरेंना कानमंत्र

औरंगबाद –राज्यसभा खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत. देशातील आणि राज्यातील कोणत्याही घटनेबद्दल त्यांनी दिलेली प्रतिक्रिया नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. काल औरंगबाद येथे पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत राऊत यांनी राजकीय प्रश्नांना सडेताेड उत्तरे दिले. मात्र त्यांचा सगळा राेष भाजप व माेदी सरकारवरच हाेता. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष व मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना सल्ला दिला.

संजय राऊत यांनी ‘साै दाऊद, एक राऊत’ अशी टॅगलाइन या मुलाखतीला देण्यात आली हाेती. राऊत म्हणाले, दिल्ली आता मुर्दाड झाली आहे. देशातल्या राजधानीत राजकीय स्वातंत्र्य संपले आहे. ‘विरोधक मुक्त भारत’ हा एकमेव उद्देश समोर ठेवून हे सरकार काम करतंय. समोर कोणी नेता नाही अशी परिस्थिती आहे. संविधानावर असाच हल्ला हाेत राहिला तर देशात स्वातंत्र्य राहणार नाही. अशा परिस्थितीत देशाला टिकवण्यासाठी भाजपच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन यूपीएची पुनर्बांधणी करावी. त्याचे नेतृत्व शरद पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांनी करावे. महाराष्ट्रात भाजपविरोधात सरकार चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतमिा आता राष्ट्रीय झाली आहे. त्यामुळे त्यांनीही दिल्लीत जायला हवे. केंद्रातील ही सत्ता उलथून टाकण्यासाठी शरद पवार व उद्धव ठाकरेंनी विराेधी आघाडीचे नेतृत्व करायला हवे. महाराष्ट्रातील या नेत्यांची आता देशाला गरज आहे,’ असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

COMMENTS